दि 30 एप्रिल 2017, वेळ सकाळी 8 ते 12.
ठिकाण भूम – उस्मानाबाद रस्ता, हिवरा गाव.
पाणी फाउंडेशन – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2.
हिवरा गाव दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी आणि जलसंधारणाचे काम करीत आहे.
सर्व सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी, शिक्षक संघटना, शेतकरी कष्ट करी, सर्व मित्र मैत्रिणी, राजकीय पक्ष यांना विनंती आहे की सर्वांनी ह्या महाश्रमदान दिनामध्ये सामील व्हायचे आहे…!!
जिल्हातील सर्व कृषिसेवक हिवरा गावामध्ये असतील…
आम्ही आमच्या गावावर प्रेमकरतो, माती आणि पाण्याबरोबरच मनं पण जोडत आहोत..
आपला विश्वासू
भूमिपुत्र फाउंडेशन
हिवरा,भूम, उस्मानाबाद
9657717087
23 एप्रिल 2017..
पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्यानिमित्त दर रविवारी सकाळी 8 ते 11 महाश्रमदान दिवस आयोजित केला आहे, सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती…
स्थळ – हिवरा ते उस्मानाबाद रस्ता….
हिवरा गाव, भूम, उस्मानाबाद
आपला विश्वासू,
सुदर्शन 9657717087
14 एप्रिल – *डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती*. जयंती सामुदायिक साजरी होईल. ठिकाण विठ्ठल रुक्मीइ मंदिरासमोर, हिवरा.
वक्ता – श्री विभूते सर, देवळाली
15 एप्रिल – महाश्रमदान दिनाची तयारी, मार्किंग पूर्ण करणे इत्यादी आणि शोष खडे खोदण्यास सुरुवात.
16 एप्रिल – *महाश्रमदान दिवस*, सर्वांनी गावासाठी एकत्रीत श्रमदान.
17 एप्रिल ते 24 एप्रिल- *अखंड हरिनाम सप्ताह*
अखंड हरिनाम सप्ताह मध्ये “विना” वाद्य अखंड उचलून घेतात आणि 8 व्या दिवासी खाली ठेवतात.
ह्यावर्षी आम्ही विना वाद्य आणि कमीत कमी टिकाव/खोरे/कुदळ उचलणार आणि 8 व्या दिवशी खाली ठेवणार… ह्यादरम्यान 2000 वृक्षारोपणाचे खडे आणि 206 शोष खडे पूर करणार… गावातील सर्व मुली आणि जावई पण सप्ताह ला गावी येऊन आम्हास ह्या श्रमदानात मदत करणार आहेत…
22 एप्रिल – *मा श्री भास्कर पेरे पाटील,* सरपंच – पाटोदा, सदस्य आदर्श गाव मंडळ महाराष्ट्र शासन.
ग्रामस्वच्छता, ग्रामप्रबोधन, ग्रामवेव्यस्था ह्यावर मार्गदर्शन..
निमंत्रक – आम्ही हिवरेकर
संपर्क – सुदर्शन जगदाळे 9657717087
भूमिपुत्र फाउंडेशन
हिवरा, ता भूम, उस्मानाबाद
-16 एप्रिल रविवार सकाळी 8 वाजता, हिवरा.
सर्व सामाजिक/शासकीय/राजकीय/शिक्षक/कामगार/व्यापारी/वकील/पत्रकार संघटना आणि सर्व मित्र परिवार, शुभचिंतकाना हिवरा ग्रामस्थांचा नमस्कार.
आम्ही गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि गाव दुष्काळमुक्त पाणीदार करण्यासाठी पुढील 41 दिवस श्रमदान करणार आहोत.
16 एप्रिल ला महाश्रमदान दिवस आयोजित केला आहे, ह्यादिवसी सकाळी 8 वाजता श्रमदान चालू होईल, आपल्या सर्वांना विनंती आहे की कमीत कमी 1 तास गावामध्ये येऊन श्रमदान करावे.
आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत येऊन श्रमदान करावे.
श्रमदानाला लागणारे साहित्य आणि चहा-पाण्याची सोय गावकरी करतील.
श्रमदानाचे ठिकाण – बस स्टॅन्ड पासून उस्मानाबाद रस्त्याकडे, हिवरा.
हिवरा, ता भूम, जिल्हा उस्मानाबाद
-आम्ही हिवरेकर
सुदर्शन भैय्या – 9657717087
“आम्ही हिवरेकर” गाव हिवरा, ता भूम, जिल्हा उस्मानाबाद चे ग्रामस्थ एकजुटीने पानी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे 2017 मध्ये भाग घेतला आहे.
गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही श्रमदानाला आज 8 एप्रिल 2017 ला चालू कले आहे
देशाच्या विकासात पहिला विकास शेतकऱ्याचा झाला पाहिजे…
आज पर्यंतच्या प्रत्येक सामाजिक कार्यात खूप काही शिकलो आहे आणि खूप बदल स्वतःमध्येच झाले आहेत….
आज पाणी फाउंडेशन मधून गावाला पाणीदार बनवणे ही माझी जिम्मेदारी वाटत आहे..
तुमच्या शुभेच्या, आशीर्वाद आणि अनमोल साथ अशीच राहू द्या…
-सुदर्शन जगदाळे
1 एप्रिल 2017
सखोल चर्चे नंतर खलील मुद्यावर एकमत झाले.
1. पाणी बचतीसाठी उपक्रम
-सर्व नळांना तुट्या बसवल्या जातील
-ज्या ग्रामस्थांचा नळ चालू राहील त्याला 500/- दंड आकाराला जाईल. दंड न भरल्यास ग्रामपंचायतीकडून कोणताही दाखल दिला जाणार नाही.
– शेतीमध्ये ज्यास्त पाणी लागणारे पीक घेण्यास बंदी आहे उदा ऊस,केळी इत्यादी. जर कोणी घेतलेच तर त्याला ठिबक अनिवार्य आहे.
2. जो व्यक्ती, घरातील पुरुष किंव्हा स्त्री वॉटर कप स्पर्धेमध्ये रोज सकाळी 8 ते 11 असे 3 तास श्रमदान करिन त्याला 2017 ची पाणी पट्टी माफ केली जाईल. पाणी पट्टी माफीचा दाखल ग्रामपंचायत देईल.
3. जे कुटुंब वॉटर कप स्पर्धे दरम्यान लावलेल्या 10 रोपांची देखभाल पुढील 3 वर्ष घेईल त्याची 2018, 19 आणि 20 ची घर पट्टी भूमिपुत्र फाउंडेशन देईन. वृक्षरोपण केलेली रोप वाटून दिली जातील व त्याचे निरीक्षण भूमिपुत्र कडून जर वर्षी केले जाईल.
4. हिवरा गावाच्या सर्व लोकसंख्या इतकी झाडे लावली जातील. तसेच लग्न होऊन गेलेल्या सर्व मुलींच्या आणि जावई च्या नावेही एक झाड लावले जाईल. सर्व मुलींना अखंड हरिनाम सप्त्याला दि 17 एप्रिल ते 24 एप्रिल ला उपस्तीत राहण्यास विनंती, ह्या काळावधीमध्येच आपण वृक्षरोपणासाठी लागणारे खड्डे घेणार आहोत. सर्व मुलींना भूमिपुत्राकडून भेटरूपी साडी व जावयाला टोपी टॉवेल दिला जाईल.
5. महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ग्रामसभा घेतली जाईल, ठिकाण विठ्ठल-रुक्मीनी मंदिरासमोर, हिवरा.
6. ग्रामपंचायतच्या प्रत्येक नियोजित कामाची माहिती ग्रामसभेला दिली जाईल. ग्रामसभेत जे ठरेल तेच काम ग्रामपंचायत हाती घेईल.
-सुदर्शन जगदाळे
[foogallery id=”3086″]
हिवरेकरांनो,
पानी फाउंडेशन ची स्पर्धा जवळ येत आहे, 8 एप्रिल ला चालू होत आहे.
आपल्या गावामध्ये पहिले बोर घेतले होते त्यावेळेस पाणी 150 फुटावर लागले आणि ह्यावर्षी तेच पाणी 700 फुटावर गेले आहे…गावामध्ये आज हि अपुरा पाणी पुरवठा आहे, विचार करा अजून 5 वर्षांनी किती वाईट परिस्थिती असेल…
आपल्या हक्काचे पाणी तळ्यात जात आहे पण वापरण्यासाठी सरकारची परवाना लागतो, खूप वेळेस तर आपल्या मोटारीचे/ पंपाचे कनेक्शन पण तोडले जाते…
म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन श्रमदानातून आपल्या गावाचा विकास करणार आहोत…
आत्ता नाही तरी कधीच नाही अशी परिस्तिथी आहे….
8 एप्रिल ते 22 मे ह्या कालावधीमध्ये सगळ्यांना खालील गोष्टी कराव्यात,
1. कमीत कमी आठवड्याचे 2 दिवस गावाकडे यायचे आहे, जर आठवड्याची सुट्टी रविवारी असेल तर एक सुट्टी शनिवारी किंवा सोमवारी टाकली व श्रमदानासाठी गावी यावे. आजच आपल्या कंपनी मध्ये सांगून टाका
2. आपल्या गावामध्ये 17 एप्रिल ते 24 एप्रिल , अखंड हरिनाम सप्ता आहे, सर्वांनी पूर्ण 8 दिवस गावामध्ये उपस्थीत राहायचे आहे.. आपण अखंड श्रमदान करणार आहोत, कसे करायचे ते गावी आल्यावर सांगतो.
3. हरिनाम सप्त्याला गावाच्या सर्व लग्न करून दुसऱ्या गावी गेलेल्या “मुली आणि जावई” ला गावी बोलवा, सगळ्यांकडून श्रमदान करून घेऊ. सप्ता एकत्र करू, सर्व जावयाला टोपी टॉवेल आणि मुलींना साडी चोळी करून वाट लावू. आजच फोन करून आपल्या बहिणीला आणि आत्याला फोन करून सप्तयाचे निमंत्रण द्या.
पूर्ण कामाचा, श्रमदानाचा, jcp, पोकलेंन, ट्रॅकर , सिमेंट बंधारे च्या खर्च अंदाजे 10 लाख होईल असे दिसत आहे… मला पैशाच्या बिलकुल काळजी नाही मला फक्त तुमची साथ ती पण फक्त 45 दिवसासाठी पाहिजे… नंतर मी जन्मभर साथ सोडणार नाही…
आपल्याला एक सुंदर आणि समृद्ध हिवरा बनवायचे आहे… सगळ्यांनी मिळून केले तर यश आणि समाधान पण मोठे असेल…
हिवऱ्याचे नाव देशाच्या नकाशावर आणायचे आहे…
सुदर्शन (भैय्या)
भूमिपुत्र फाउंडेशन