+91-9527911911 mylife221015@gmail.com

My Initiatives

हिवरा गावचे पाणी फाउंडेशन स्पर्धे दरम्यान झालेल्या कामाची माहिती घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, भूम चे तहसीलदार श्री सुरेंद्र देशमुख, चला हवा येउद्या मधील कलाकार श्री भारत गणेशपुरे, शिवार संसद चे प्रमुख श्री विनायक हेगाना.

वेळापत्रक, 1 जुलै 2017, शनिवार.

6 वाजता – मान्यवरांचे आगमन आणि शिवार फेरी सुरुवात, जलसंधारण कामाची माहिती घेणे
7 वाजता – हिवरा गावमधी रस्त्यावर 20 झाडांचे वृक्षारोपण
7:30 वाजता – ग्रामस्थांना मार्गदर्शन.

विद्यार्थ्यांचे शिक्षण, महिलांना व्यवसाय, तरुणांना सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रामधील मार्गदर्शन केले जाईल. गावाचा तरुण विकसित झाला पाहिजे ह्या हेतूने काही उपक्रम गावासाठी राबवले जातील…!!

शिवार संसद सामाजिक संस्थे मार्फत विविध क्षेत्रामध्ये मदत केली जाईल, सर्व उपक्रमाची घोषणा श्री विनायक हेगाना करतील

संदेश सागळ्यांपर्यंत पाठवा, सगळे उपस्थित राहू!!

-सुदर्शन जगदाळे

Liked This?
Spread the love

Persistent Foundation , Pune.

तर्फे आपल्या हिवऱ्याला आर्थिक सहाय्य , रक्कम 1 लाख.

माझ्या पुण्यातील कंपनीकडून गावासाठी मदत.

-सुदर्शन जगदाळे

Liked This?
Spread the love

हिवरेकरानो, माझ्या मित्रानो, बंधू भगिनींनो…

हिवरा हे गाव जगाच्या नकाशावर येईल, सगळीकडे गावचे कौतुक होईल, हिवऱ्यातील माणुसकी, प्रेम जगाला मिळेल…
आपल्या कला गुणांचे सगळ्यांना उपयोग होईल असे काम आपल्याला करायचे आहे आणि आपण त्याची सुरुवात जानेवारी 2017 पासून पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून केली पण आहे…
तुमची साथ आणि मेहनत हीच गावाच्या विकासाची पहिली पायरी आपण गाठली आहे…

पाण्यावर काम केल्याने आपण आज महाराष्ट्रात ओळखले जाते आहोत… विविध अधिकारी आणि संस्था चे फोन येतात आणि मदतीचे हात पुढे करत आहेत… ही मदत आपण गावासाठी कशी वापरता येईल ह्याचे नियोजन आणि आराखडा पण तयार करत आहोत.

मी गावामध्ये कमीत कमी 15 दिवसांनी येणार आहे , पण तुम्ही तिकडे राहून जोत पेटती ठेवा

आपल्या रविवारच्या 8 ते 10 श्रमदानामध्ये सगळ्यांना सामील करून घ्या.

परगावाचे कोणी माहिती घेण्यासाठी गावामध्ये आले तर त्याला माहिती देत जा… तुमच्या बोलण्यामध्ये प्रेम असुद्या आपुलकी असुद्या…. आपण गावचे नागरिक आहेत, आपण जसे बोलू तसे आपणाला गाव समजले जाते त्यामुळे प्रेम द्या आणि प्रेम घ्या….

एकत्रित रहा….
मुलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यवसाय आणि शेती विकास ह्या विषयावर आपल्याला काम करायचे आहे… एक स्मार्ट व्हिलेज म्हणून गाव पुढे येणार आहे…

ह्या वर्षीची मासोबची यात्रा पण वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा मानस आहे …

परत भेटू 14 जुलै ला… 👍👍

-सुदर्शन जगदाळे

Liked This?
Spread the love

जीडीपी फाउंडेशन ने “हिवरा” ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाचे कौतुक केले आणि आमची जिम्मेदारी वाढवली…. हिवरा गाव हे इतर दुष्काळी गावासाठी प्रेरणा ठरू शकते अश्या भावनेतून केलेल्या कामाचा आदर आणि सत्कार केल्याबद्दल “आम्ही हिवरेकर”, पाणी फाउंडेशन टीम, गावासाठी काम केलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि भूम परंड्यातही मित्र मंडळी आपले आभारी आहोत…

सन्मान आणि सत्कार हे शब्द आमच्यासाठी जिम्मेदारी वाढवणारेच….!!
भूम परंड्यातही इतर गावांना जलसंधारणावरील सर्व तांत्रिक आणि सामाजिक माहिती देण्याचे काम आम्ही हिवरेकर नक्की करू…!!

पाणी फाउंडेशन च्या साह्याने हिवरा गावामध्ये एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा आमचा मानस आहे…!!

– सुदर्शन भैय्या


[foogallery id=”3358″]

Liked This?
Spread the love

हिवरा ता. भुम
गावात शोष खड्डे झाले.
या हापसाचे पानी रसत्यावर येत होते . याचे पुनर्भरन करन्यात आले.
दर रवीवार श्रमदान करन्याचा हिवरेकरांचा निर्नय…..
आज (रवीवार 25/6/2017) सकाळी हिवरा येथील युवक वर्गानी भगवान जगदाळे यांच्या घरासमोरील हापशाचे पाणी पुर्णपणे रस्त्यावर येत होते, त्यामुळे डासाचे प्रमाण वाढत होते, म्हणून गावातील युवकांनी श्रमदानातून हापशाचे पुनर्र:भरण केले, व हापशाचे पाणी रस्त्यावर येणार नाही व त्याच ठिकाणी मुरले जाऊन हापशाची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार…


[foogallery id=”3307″]

Liked This?
Spread the love

आज राञी 8 वाजता तरूण मंडळी एकञ जमा झाली. व आपन जी कामे केली, ती करत असताना कोनते अनुभव आले ते शेयर केले.
हिवरेकरांनी संकल्प केला आहे कि आठवडयातून एक दिवस श्रमदान करायचे. जेनेकरून गाव, तरून मंडळी एकञ राहतील व चांगले नियोजन होईल.
उदया दिनांक 25/6/2017 रोजी हिवरा येथील शाळेची साफ सफाई करने. व गावातील भगवान जगदाळे यांचा घरासमोरील हाफशाचे पुनः भरन करायचे आहे.

Liked This?
Spread the love
Liked This?
Spread the love

-हिवरेकर

Liked This?
Spread the love

जल क्रांतीचे प्रणेते डॉ. अविनाश पोळ यांनी 20 मे 2017 रोजी हिवरा , ता भूम जी उस्मानाबाद येथे येऊन गावातील शोषखड्डे , सीसीटी आणि एलबीस ची पाहणी करून गावातील तरुणांना मार्गदर्शन केले आणि ही जलक्रांतीची चळवळ अशीच सातत्याने पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरणा दिली.
#भुमीपुत्र #Panifoundation #watercup2017 #satyamevjayate #hiwara #bhoom #Osmanabad #श्रमदान

 

[foogallery id=”3284″]

Liked This?
Spread the love

पाणी फॉउंडेशन आणि सत्यमेवजयते आयोजित वॉटर कप स्पर्धा 2017 मध्ये दिनांक 16 मे 2017 मंगळवार रोजी मौजे हिवरा ता भूम येथे ( वळू , देऊळ, जाऊदया ना बाळासाहेब, दंगल ) या चित्रपटाचे अभिनेते ‘ मराठवाडा वीर ‘ गिरीश कुलकर्णी हे पाणी फाउंडेशन च्या कामाची पाहणी करायला आले .. त्यांनी श्रमदान सुद्धा केले व गावातील तरुणांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. वेळात वेळ काढून गिरीश सरांनी हिवरा गावासाठी अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे सर्व हिवरेकरांकडून मन पूर्वक आभार ..
त्यांच्या सोबत असलेले काही फोटो. ……….!!!
#भुमीपुत्र #Panifoundation #watercup2017 #satyamevjayate #hiwara #bhoom #Osmanabad #श्रमदान

[foogallery id=”3294″]

Liked This?
Spread the love

Scroll to Top