कामावर येणाऱ्या महिलांना एक लक्की ड्रा ठेवला आहे, सगळ्या महिलांच्या नावाने चिट्टी काढली आहे आणि एक लहान मुलाला उचलायला लावली आहे..
आजची वस्तू 1500/- कूलर आहे.
आज ची विजेता गिराज बाई गरड.
त्या सर्वाना परिचित आणि रोज कामावर येतात.
स्पर्धेचा उत्साह वाढवण्यासाठी एक उपक्रम चालू केला आहे.
काल पासून संध्याकाळी नाष्टा ठेवतोय आपण.
काल मुरमुरे आणि फरसाण होते.
आज केळी, भजी, मुरमुरे फरसाण.
उद्या सकाळी पोहे. आज एक खूप चांगला आणि सामाजिक मित्र झाला आहे. श्री विठ्ठल बाराते, वडापाव आणि भजी वाला. त्याचा स्टॉल भूम गोलाईत लागतो
तो उद्या सगळ्यांना पाहे घेऊन येणार आहे.
महाश्रमदानाला पण त्याच्या मित्रांना घेऊन येणार आहे..
वॉटर कप स्पर्धा व माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हिवरा ता.भूम येथील महाश्रमदान महायज्ञ कार्यक्रमातील सहभाग या पार्श्वभूमीवर मा.शि.अ.(प्राथमिक व माध्यमिक )यांनी दि.12 मे 2117 रोजी सकाळी 11.00 वाजता पं.स.सभागृह भूम येथे बैठकीचे आयोजन केले आहे .
सदर बैठकीस भूम व वाशी तालुक्यातील जि.प.व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मु.अ.नी वेळेवर उपस्थित राहावे .तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्र प्रमुख ,विषय साधन व्यक्ती व मोबाईल टीचर यांनीही उपस्थित राहणे आवश्यक आहे याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी .सदर बैठकीत मा.मु.का.अ. हेही आपणांस मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे कुणीही गैरहजर राहू नये असे सूचित करण्यात येते .
ग.शि.अ.भूम /वाशी
पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017…
हिवरा ग्रामस्थांची कामाची चिकाटी, स्पर्धेमधील सहभाग आणि उत्साह पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, स्वतः श्रमदानाला येत आहेत. आमचा उत्साह अजून वाढला आहे.
दि 13 मे 2017, वेळ सकाळी 10:45 ते 11:25 वाजता.
सर्वाना श्रमदानासाठी निमंत्रण….. आज तुम्ही हिवाऱ्यासाठी काम कराल तर एक दिवस आम्ही पण तुमच्या शिवारात येऊन काम करू….
आम्ही हिवरेकर रोज सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 8 ते 11 श्रमदान करतो.
भूम परांडा तालुका तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद…💐☺
आपला विश्वासू,
श्री सुदर्शन जगदाळे
भूमिपुत्र फाउंडेशन
पाणी फाऊंडेशन आणि सत्य मेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा २०१७
हिवरा ता भूम जी उस्मानाबाद.
पानी फाउंडेशनचे उदिष्ट हे पाणलोट विकासाच्या कामामध्ये एक लोकचळवळ निर्माण करणं आहे!
गावातील लोकांना श्रमदानाचे महत्व पटून देण्यासाठी आणि श्रमदानाला येण्यासाठी गावातील नागरिकांनी विविध मार्ग काढले .
६ मे २०१७ रोजी सकाळी ७ वाजता सर्वांच्या घरासमोर पाण्याचा सडा टाकून रांगोळी काढल्या आणि जे येतात त्याच्या घरासमोर धन्यवाद सुद्धा काढायला विसरले नाहीत .
#भूमिपुत्र #श्रमदान #पानिफॉउंडेशन #वॉटरकप२०१७ #सत्यमेववजयते # हिवरा #भूम #उस्मानाबाद
#धन्यवादगावकरी #आम्हीहिवरेकर
[foogallery id=”3238″]
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message



