1. कु अभिजित भारत सावंत
2. श्री अंगद जगदाळे
3. कु सुजित नरसिंह जगदाळे
4. कु संभाजी सुभाष जगदाळे
5. सौ शीतल तानाजी जगदाळे
6. सौ लक्ष्मी राहुल कवडे
पाणी फाउंडेशन हिवरा प्रशिक्षण टीम.
ह्यावर्षीच्या कामाची काल संध्याकाळी महिलांच्या बैठकीपासून सुरुवात झाली.
प्रशिक्षणाला जाणार्याचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन. तुमच्या हातून गावाचा विकास व्हावा हीच इच्छा!!💐💐
आपणास कळविण्यात आनंद 😊 होतो की आपल्या तालुक्यातील पानी 💧फाउंडेशन आयोजीत सत्यमेव जयते वॉटर कप 🏆-3 च्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली असुन तिसरी बॅच दिनांक 04/03/18 ते 07/03/18 या कालावधीत होणार आहे. आपल्या तालुक्यातील प्रशिक्षणाला जाण्यासाठी तिसर्या बॅच मध्ये पुढील गावांची निवड करण्यात आली आहे.
1) वाल्हा
2) वरुड
3) भोगलगाव
4) चिंचपुर ढगे
5) नागेवाडी
6) जोतीबाचीवाडी
7) वारेवडगाव
8) मात्रेवाडी
9) देवळाली
10)सावरगाव पा.
11)अरसोली
12)गनेगाव
13)हिवरा
तरी या गावातील ग्रामस्थांनी ज्यांना गावातून प्रशिक्षणार्थी म्हणून निवडले आहे त्यांनी प्रशिक्षणाला जाण्यासाठी पुढील काळजी घ्यावी.
★आपला प्रवास सुखकर होण्यासाठी बस चे तालुक्यातुन नियोजन करण्यात आले आहे.
★आपण बस सेंटरला आपल्याला दिलेल्या वेळेला आपण उपस्थित राहावे.
★आपल्या गावातील प्रशिक्षणार्थींनी येते वेळी पुढील काळजी घ्या.
(वयस्कर, लहान मुले ,आजरी व्यक्तींना शक्यतो टाळावे.)
★आपल्या पैकी कोणाला बीपी,शुगर, किंवा इतर गोळ्या सुरू असतील तर त्या सोबत ठेवा.
* वेळ सकाळी :9:30
* ठिकान : पंचायत समीती ,भूम
येथे सर्वांनी वेळेत हजर रहावे.
( महत्वाची सुचना:- वरील पैकी जे गाव प्रशिक्षनाला येनार नाही ते गाव स्पर्धेतुन बाहेर पडेल क्रपया आपले गाव स्पर्धेतुन वगळुनये यासाठी सर्व प्रशिक्षनार्थींनी वेळेत यावे ही नम्र विनंती.)
💧पानी फाउंडेशन भूम💧
9011523536
9130107171
🙏🙏
पाणी फाउंडेशन, वॉटर कप स्पर्धा 2018 निम्मित जनजागृती बैठक, पंचायत समिती भूम.
तालुक्यातील जवळपास 75 तरुणांचा सहभाग, विविध विषयांवर चर्चा, अनेकांनी आपण कोणत्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहोत ह्याबद्दल माहिती.
आपला विकास, आपला समाज परिवर्तन हे आपणच करु शकतो, नव्हे ते आम्हीच एकत्र येऊन करणार आहोत ह्याचा संकल्प.
समाजाचं काहीतरी देणं लागत….
जागरूक समाजाला जागरूक आणि विकासभिमुक प्रशासन आणि नेतृत्व लाभते…
आम्हाला जो बदल समाजात पाहिजे तो आम्ही अगोदर आमच्यात करणार…
अश्या अनेक विषयांवर सर्वांनी मनोगत व्यक्त केले…
पुढे काय?
ही लोकचळवळ निरंतर चालेल, समाजातले त्या त्या वेळेस चे मुद्दे घेऊन काम करणार.
महिन्यातील चौथा (४) रविवार कोणत्याही एका गावामध्ये जाऊन, प्रामुख्याने पाणी फाउंडेशन ची मोहीम प्रत्येक गावात पोहचवणे आणि श्रमदान करणे…
खालील प्रमुख मुद्दे
1. जलसंधारण
2. शैक्षणिक, व्यावसायिक शिक्षण
3. आरोग्य
4. क्रीडा
आम्ही जग बदलू की नाही हे माहीत नाही पण बदलल्याचा प्रयत्न अति उत्साहाने आणि इमानदारीने करू… !!
उद्या 22 ऑक्टोबर, चौथा रविवार, चुंबली येथे शोषखड्याचे काम. वेळ 8 ते 10, स्थळ चुंबली, ता भूम.
संपर्क – श्री अण्णासाहेब तांबे, सरपंच, चुंबली
– 9623187960
सर्वाना विनंती आहे की वेळेवर उपस्थित रहावे.
– सामाजिक बांधिलकी/सामाजिक चळवळ
-SuDarshan Jagadale

*सत्यमेव जयते वॉटर कप २०१७*
भूम आणि परंडा तालुक्यातील विजेत्या गावांचा भव्य सत्कार समारंभ*
स्थळ-हिवरा, ता भूम.
वेळ- १४ ऑगस्ट, संध्याकाळी ७ वा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष – श्री प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील, अध्यक्ष – धनेश्वरी शिक्षण समूह, महाराष्ट्र आणि छत्तीसगड
शुभहस्ते- श्री संजय मिस्किन, वरिष्ठ पत्रकार, सकाळ वृत्तसमूह.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक,
श्री मंगरुळकर, उपविभागीय कृषिअधिकारी,भूम.
श्री स्वप्नील मोरे, उप जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी, भूम.
श्री सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, भूम.
श्री राजू कांबळे, गट विकास अधिकारी, भूम.
श्री माधव सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक, भूम.
श्री गणेश दुरंडे, कृषिअधिकारी, भूम.
श्री गोरख भोरे, उद्योगपती आणि मराठवाडा युवा अध्यक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटना.
श्री गोरख कातुरे, उद्योगपती, अध्यक्ष – जी डी पी फाउंडेशन पुणे.
आयोज़क – सर्व मराठी पत्रकार बांधव भूम तालुका, जिल्हा उस्मानाबाद.
जिंकलो रे जिंकलो…..
“सत्यमेवजयते वॉटर कप” “पाणी फाऊंडेशन” २०१६-२०१७ या स्पर्धेत भूम तालुक्या मधून आमच्या “हिवरा” गावाने प्रथम बक्षीस मिळवले.
………हिवरा रॉक्स…….
हिवरा गावाला मिळालेलं यश, पाणी फाऊंडेशन चे 10 लाखाचे बक्षीस आणि महाराष्ट्र सरकार चे 8 लाखाचे बक्षीस..!! हे सर्व त्या माझ्या गावकऱ्यांचे यश आहे ज्यांनी 45 दिवस, दिवस-रात्र केलेल्या मेहनतीचे फळ आहे. 42 डिगरी तापमाना मध्ये, कित्येक वेळेस पाणी आणि जेवण मिळायचे नाही, सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर पडायचे आणि रात्री 12 वाजता घरी जायचे… अश्या त्या सर्व कष्टकरी बंधू बघिनी, माता माऊली चे यश आहे…!!
गाव दुष्काळ मुक्त करणे हेच ध्येय..!!
आम्ही राज्यातील इतर गावाबरोबर स्पर्धा केली मात्र अनेक कारणांमुळे थोडे कमी पडलो….गावातुन मोबाईल संपर्क साधायचा असेल तर एक किलो मीटर जाऊन संपर्क करावा लागतो..कारण मोबाईल टॉवर नसल्याने सिग्नल मिळत नाही.. पुढील 6 महिन्यात असल्या अनेक अडचणी दूर करून परत पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने “आम्ही हिवरेकर” स्पर्धेत सहभाग घेऊ.
2016 चे विजेते, गाव – वेळू, पश्चिम महाराष्ट्र.
2017 चे विजेते, गाव – काकडदरा, विदर्भ.
आत्ता
2018 चे विजेते, ?? मराठवाडा??
-सुदर्शन (भैय्या) जगदाळे
भूमिपुत्र
#paanifoundation
#watercup2017
#mylifeindia
[foogallery id=”3439″]
हिवरा
पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून प्रेरित ग्रामस्थांनी दर रविवारी सकाळी 8 ते 10 गावाच्या विकासासाठी श्रमदान करायचे ठरवले आहे.
आज दिनांक 2 जुलै रोजी जि प शाळेची साफ सफाई, वृक्षारोपण, झाडाला पाणी घातले जुन्याझाडांचे खड्डे रुंद केले ..
-सुदर्शन भैय्या
#paanifoundation #hivra
#bhoomiputra
[foogallery id=”3320″]
“चला हवा येऊ दया” कार्यक्रमातील व प्रसिध्द सिने अभिनेते श्री.भारत गणेशपुरे व तसेच “शिवार संसद युवा चळवळ” या संस्थेचे संस्थापक श्री. विनायक हेगाणा यांनी आज हिवरा येथे पानी फाऊंडेशन स्पर्धेदरम्यान झालेल्या कामाची पाहणी केली. व त्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. व त्यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच या संस्थेने गावातील एकजुट बघून एक-एक विषयावर काम करण्यास सुरवात केली आहे व गावातील 12 मुले दत्तक घेतले असुन, त्यांना श्री.भारत गणेशपुरे यांच्या हस्ते (स्कूल बॅग) वाटप करण्यात आल्या. व पुढील कार्यास गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
ता. भुम
[foogallery id=”3332″]
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message