+91-9527911911 mylife221015@gmail.com

Category Archives: Bhoomiputra Foundation

Bhoomiputra Foundation

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017, 45 दिवसांमध्ये हिवरेकरांनी केलेल्या कामाची  आणि आर्थिक जमा खर्चाची माहिती.

*श्रमदानातून केलेलं काम*
1. वृक्षरोपन खड्डे   -1327
2. विहीर पुनर्भरण – 05
3. सलग समतर चर (CCT) – 846 घन मी.
4. कंपार्टमेंट बंडींग (FB) – 1334 घन मी.
5. अनघड दगडी बांध/ लूज बोल्डर स्ट्रक्चर (LBS) – 836 घन मी.
*मनुष्यबळ काम एकूण 3016 घन मी.*

*मशीन च्या साह्याने केलेलं काम*
1. नांदेड पॅटर्न शोष खड्डे – 200
2. नाडेप खड्डे – 30
3. अस्तित्वात असलेल्या रचना दुरुस्ती (2 पाझर तलाव आणि एक सिमेंट बंधारा) – 03 
4. शेततळे  – 12 (37,650 घन मी)
5. खोल समतर चर (DCCT/WAT) – 16,307 घन मी
6. फार्म बंडींग (FB) – 2,793 घन मी
7. माती नाला बांध  – 3,802 घन मी
8. नाला खोलीकरण – 8,619 घन मी

*यंत्राने केलेलं पूर्ण काम 69,171 घन मी*

1. 15 जून 2017 पर्यंत, एकूण खर्च – 16,73,154/- 
2. एकूण देणगी –                              9,32,140/- 
3. एकूण आर्थिक तूट (सुदर्शन भैय्या जगदाळे  ने दिले)                               7,41,014/-
4. शेततळ्याचे पैसे कृषी विभागाने दिले तर 6,00,000/- मिळतील. 

*पूर्ण जमा खर्चाचे ऑडिट केले जाईल.*

गावासाठी, पाण्यासाठी मेहनत घेतल्या सर्वांचे मनापासून आभार आहोत. तुमच्या सहकाऱ्याला आमचा सलाम..!!

सर्व मेहनत, केलेलं काम हिवाऱ्यातील थोरा मोठ्यांच्या चरणी अर्पण, हिवऱ्याचे *ग्रामदैवत म्हसोबाच्या* चरणी अर्पण, माणसातील देव, आमचा *राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या* चरणी अर्पण….!!

आत्ता पुढील काम करण्यासाठी आम्ही हिवरेकर  तयार…!!

Thanks & Regards,  
SuDarshan Jagadale
MyLife Foundation 
http://mylifeindia.org

+919527-911911



Scroll to Top