हिवरेकरानो, माझ्या मित्रानो, बंधू भगिनींनो…
हिवरा हे गाव जगाच्या नकाशावर येईल, सगळीकडे गावचे कौतुक होईल, हिवऱ्यातील माणुसकी, प्रेम जगाला मिळेल…
आपल्या कला गुणांचे सगळ्यांना उपयोग होईल असे काम आपल्याला करायचे आहे आणि आपण त्याची सुरुवात जानेवारी 2017 पासून पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून केली पण आहे…
तुमची साथ आणि मेहनत हीच गावाच्या विकासाची पहिली पायरी आपण गाठली आहे…
पाण्यावर काम केल्याने आपण आज महाराष्ट्रात ओळखले जाते आहोत… विविध अधिकारी आणि संस्था चे फोन येतात आणि मदतीचे हात पुढे करत आहेत… ही मदत आपण गावासाठी कशी वापरता येईल ह्याचे नियोजन आणि आराखडा पण तयार करत आहोत.
मी गावामध्ये कमीत कमी 15 दिवसांनी येणार आहे , पण तुम्ही तिकडे राहून जोत पेटती ठेवा
आपल्या रविवारच्या 8 ते 10 श्रमदानामध्ये सगळ्यांना सामील करून घ्या.
परगावाचे कोणी माहिती घेण्यासाठी गावामध्ये आले तर त्याला माहिती देत जा… तुमच्या बोलण्यामध्ये प्रेम असुद्या आपुलकी असुद्या…. आपण गावचे नागरिक आहेत, आपण जसे बोलू तसे आपणाला गाव समजले जाते त्यामुळे प्रेम द्या आणि प्रेम घ्या….
एकत्रित रहा….
मुलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यवसाय आणि शेती विकास ह्या विषयावर आपल्याला काम करायचे आहे… एक स्मार्ट व्हिलेज म्हणून गाव पुढे येणार आहे…
ह्या वर्षीची मासोबची यात्रा पण वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा मानस आहे …
परत भेटू 14 जुलै ला… 👍👍
-सुदर्शन जगदाळे
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message