+91-9527911911 mylife221015@gmail.com

आत्ता नाही तरी कधीच नाही…

हिवरेकरांनो,

पानी फाउंडेशन ची स्पर्धा जवळ येत आहे, 8 एप्रिल ला चालू होत आहे.
आपल्या गावामध्ये पहिले बोर घेतले होते त्यावेळेस पाणी 150 फुटावर लागले आणि ह्यावर्षी तेच पाणी 700 फुटावर गेले आहे…गावामध्ये आज हि अपुरा पाणी  पुरवठा आहे, विचार करा अजून 5 वर्षांनी किती वाईट परिस्थिती असेल…
आपल्या हक्काचे पाणी तळ्यात जात आहे पण वापरण्यासाठी सरकारची परवाना लागतो, खूप वेळेस तर आपल्या मोटारीचे/ पंपाचे कनेक्शन पण तोडले जाते…

म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन श्रमदानातून आपल्या गावाचा विकास करणार आहोत…
आत्ता नाही तरी कधीच नाही अशी परिस्तिथी आहे….

8 एप्रिल ते 22 मे ह्या कालावधीमध्ये सगळ्यांना खालील गोष्टी कराव्यात,

1. कमीत कमी आठवड्याचे 2 दिवस गावाकडे यायचे आहे, जर आठवड्याची सुट्टी रविवारी असेल तर एक सुट्टी शनिवारी किंवा सोमवारी टाकली व श्रमदानासाठी गावी यावे. आजच आपल्या कंपनी मध्ये सांगून टाका

2.  आपल्या गावामध्ये 17 एप्रिल ते 24 एप्रिल , अखंड हरिनाम सप्ता आहे, सर्वांनी पूर्ण 8 दिवस गावामध्ये उपस्थीत राहायचे आहे.. आपण अखंड श्रमदान करणार आहोत, कसे करायचे ते गावी आल्यावर सांगतो.

3. हरिनाम सप्त्याला गावाच्या सर्व लग्न करून दुसऱ्या गावी गेलेल्या “मुली आणि जावई” ला गावी बोलवा, सगळ्यांकडून श्रमदान करून घेऊ. सप्ता  एकत्र करू, सर्व जावयाला टोपी टॉवेल आणि मुलींना साडी चोळी करून वाट लावू. आजच फोन करून आपल्या बहिणीला आणि आत्याला फोन करून सप्तयाचे निमंत्रण द्या.

पूर्ण कामाचा, श्रमदानाचा, jcp, पोकलेंन, ट्रॅकर , सिमेंट बंधारे च्या खर्च अंदाजे 10 लाख होईल असे दिसत आहे… मला पैशाच्या बिलकुल काळजी नाही मला फक्त तुमची साथ ती पण फक्त 45 दिवसासाठी पाहिजे… नंतर मी जन्मभर साथ सोडणार नाही…

आपल्याला एक सुंदर आणि समृद्ध हिवरा बनवायचे आहे… सगळ्यांनी मिळून केले तर यश आणि समाधान पण मोठे असेल…
हिवऱ्याचे नाव देशाच्या नकाशावर आणायचे आहे…

सुदर्शन (भैय्या)
भूमिपुत्र फाउंडेशन

Liked This?
Spread the love

Leave a reply

Specify Facebook App ID and Secret in the Super Socializer > Social Login section in the admin panel for Facebook Login to work

Specify Google Client ID and Secret in the Super Socializer > Social Login section in the admin panel for Google and Youtube Login to work

Scroll to Top